3km
चंद्रकांत वारघडेंचे पर्यावरण संवर्धनाचे काम आदर्शवत:आमदार पवार..* *-मुलीच्या लग्नात वृक्षमित्र वारघडे परिवाराकडून ११०० रुद्राक्षांची झाडे वाटप-*

*••||वाघोली:विजय लोखंडे,दि.१३/५/२०२३||••* ••हवेलीतील बकोरी डोंगर परिसरात चंद्रकांत वारघडे यांनी मोठे वृक्ष लागवड करून वनराई प्रकल्प उभारून पर्यावरण राखण्याचे मोठे आदर्शवत कार्य केले आहे.सर्व क्षेत्रात तसे पाहिले तर वारघडे यांचे काम समाजहिताचे असून चंद्रकांत वारघडे यांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात मानपान म्हणून अनेक रुद्राक्षांची झाडे वाटप करून समाजासमोर एक आदर्श उभा केला असल्याचे मत व्यक्त करताना आमदार अशोक पवार यांनी सांगितले. पवार पुढे म्हणाले,चंद्रकांत वारघडेंचे पर्यावरण संवर्धनाचे काम आदर्शवत काम करीत असून अशाप्रकारे प्रत्येक विवाह सोहळ्यात वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने संपत चाललेली झाडे पुन्हा ऊभी राहतील व पर्यावरणाचा होत चाललेला रास थांबेल.असे आमदार अशोक पवारांनी बोलताना सांगितले. ••सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांची मुलगी चि.सौ.का.धनश्री व चि.राहुल यांचा विवाह सोहळ्यात माहिती सेवा समितीचे अध्यक्ष तथा वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी मुलीच्या लग्नात इतर खर्चाला फाटा देत रुद्राक्षांची एकूण अकराशे ११०० झाडे मानपान म्हणून पाहुण्यांना वाटली.या विवाह सोहळ्यासाठी पुणे जिल्यातून नव्हेतर राज्यातून हजारो नागरीक उपस्थित होते एक आगळा वेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरीक महीला भगिनी उपस्थित होत्या.वृक्ष वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार,पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पार पडले. ••याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर चंद्रकांत कोलते,वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे,प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल शिवले,बाजार समितीचे संचालक नानासाहेब अबनावे,प्रशांत काळभोर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील,शांताराम कटके,दत्तात्रय हरगडे,माऊली वाळके,जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशर पवार,उद्योजक सदाशिव पवार,आदी महाराष्ट्र राज्य सह जिल्ह्यातील सर्वपक्षीय,आदी संघटना,संस्थांचे पदाधिकारी,पत्रकार तसेच हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते. ••वारघडे व पोटवडे परीवाराच्या वतीने आलेल्या सर्वांचे अभार वधुपिता चंद्रकांत वारघडे यांनी मानले स्वागत मुलीचे मामा संदीप कोलते यांनी तर लग्न सोहळ्याचे सुत्र संचालन इंगवले व शहाजी वारघडे यांनी केले.

—-विजय लोखंडे https://3km.in/post-detail/3-km-post/75628

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *