10/11/2022

  • Tree Plantation

Anna Hazare

जेष्ठ समाजशेवक अण्णा हजारे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरी देवराईत केले ५०० झाडांचे वृक्षरोपण.
बकोरी येथील वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांचे माध्यमातुन बकोरी डोंगरावर वनराई देवराई प्रकल्प साकारत आहे चंद्रकांत वारघडे यांनी १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने झाडे लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचे माध्यमातून वृक्षमित्र धर्मराज बोत्रे यांचे सहकार्याने पि़पळे जगताप याठिकाणी दुसरी देवराई ऊभी राहात आहे आज अखेर १ लक्ष झाडे लावल्याचे वारघडे यांनी सांगितले त्यांचे दादा बाबाजी वारघडे या संस्थेच्या माध्यमातून गेले ४ /५ वर्षापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वाघोली येथील ऊद्योजक मनोज कांकरिया यांचे आई प्रतिष्ठान या संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी २ लाख देशी झाडांचे बियाणे वारकर्यांना वाटप केले जाते व एक झाड वारीचे वाटेवर ही मोहीम राबवली जाते वारकर्यांना झाडांचे महत्व सांगुन झाडे लावणे, पर्यावरण रक्षण, जलसंधारण याबाबत माहिती दिली जाते त्याच प्रमाणे वारघडे यांनी आज अण्णा हजारे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण करण्यासाठी आलेल्या टोयटा कंपनीच्या कर्मचार्यांना एक आव्हान केले की मी तुम्हाला १० कीलो माती देतो १० पिशव्या देतो आपण प्रतेकाने घरी १० झाडे तयार करुन द्या पुढील वर्षी आपण त्याचे वृक्षरोपण करु कोणत्याही नागरीकाने अशाप्रकारे माघनी केली तर त्यांना हे साहित्य मोफत दिले जाईल असे वारघडे यांनी सांगितले. 

आजचे वृक्षरोपणासाठी चंद्रकांत वारघडे यांचेसहीत, बाळासाहेब वारघडे (राज्य संघटक माहीती सेवा समीती) संदीप डफळ ( सर )वैकफील्ड कंपनीचे एच .आर.योगेश सातव (सर ),तुकाराम डफळ ,वाय.टी.डी.एस.सोसायटीचे चेअरमन अमित बिंगानिया, संदीप कोलते, अंतोश वारघडे,लक्ष्मण गव्हाणे (जिल्हा अध्यक्ष माहिती सेवा समिती) कमलेश बहीरट (हवेली तालुका अध्यक्ष माहिती सेवा समिती) अमित साळुंक (उपाध्यक्ष हवेली तालुका माहिती सेवा समीती) अंकुश कोतवाल (जिल्हा उपाध्यक्ष माहिती सेवा समिती) रवी सलगीरे, तसेच टोयटा कंपनीचे कर्मचारी बकोरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज त्याठिकाणी ऊंबर, कडु लींब, चिंच, अर्जून, पुत्रजिवा, वड,सिसम,करंंज, भेंडी,फणस,जांभुळ, पिंपळ,कांचन,आपटा या देशी झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले.


On the occasion of the birthday of veteran social worker Anna Hazare, 500 trees were planted today at the Bakhori Devorai project.

Through the efforts of Chandra Kant Wargade, the Bakhori Devorai project is taking shape on the Bakhori hills. Chandra Kant Wargade has pledged to plant 10 million trees and is making efforts through various methods to achieve this. With the support of tree friend Dharma Raj Botre, the second Devorai is established at Pipale Jagtap. Wargade has announced that they have planted a total of 100,000 trees.

For the past 4-5 years, through the Dada Babaji Wargade Foundation, in collaboration with the Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi procession and the IAI Foundation led by entrepreneur Manoj Kankariya, 200,000 indigenous tree seeds are distributed to the pilgrims every year. The initiative also includes educating the pilgrims about the importance of trees, environmental protection, and water conservation.

Wargade also issued a challenge to the employees of Toyota Company who came to participate in today's tree planting event. He offered them 10 kg of soil and 10 bags of seeds with the challenge to plant 10 trees each at home, which will be planted as trees next year. He mentioned that if any citizen accepts this challenge, the materials will be provided free of charge.

Today's tree planting event saw participation from Chandra Kant Wargade, Balasaheb Wargade (State Coordinator of Information Service Committee), Sandeep Daphal (Senior), HR Yogesh Satav (Waikfield Company), Tukaram Daphal, Amit Bingania (Chairman of Y.T.D.S. Society), Sandeep Kolte, Antosh Wargade, Lakshman Gavhane (District President of Information Service Committee), Kamlesh Bahirat (Haveli Taluka President of Information Service Committee), Amit Salunkhe (Vice President of Haveli Taluka Information Service Committee), Ankush Kotwal (District Vice President of Information Service Committee), Ravi Salgire, and Toyota Company employees, along with a large number of local residents of Bakhori. Today, indigenous trees such as Umbra, Bitter Lime, Tamarind, Arjun, Pootrajiva, Banyan, Sisam, Karanj, Bhendi, Jackfruit, Jamun, Peepal, Kanchan, and Apta were planted.

Gallery