05/07/2024

  • Festive Plantation

Distributing seeds of indigenous trees

पालखी सोहळ्यातील चहा नाश्ता वाटपाचा आई प्रतिष्ठानचा ऊपक्रम कौतुकास्पद -ह.भ.प. मिना (काकी) सातव पाटील 

       मागील २२ वर्षांपासून आई प्रतिष्ठान वाघोली, भारतीय जैन संघटना वाघोली यांचे माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चहा नाश्ता , रेनकोट, पिशव्या वाटप करण्यात येत आहे तसेच दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान बकोरी यांचे माध्यमातून मागील ४ वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी , वृक्षलागवडीस प्रेरणा देण्यासाठी देशी झाडांच्या बिया वारकऱ्यांना वाटप करण्यात येत आहेत त्या कार्यक्रमा वेळी ह.भ.प.मिना काकी सातव बोलत होत्या.

    सासवडच्या पुढे बेलसर फाट्यावर प्रमुख आयोजक मनोज कांकरीया व त्यांचे सहकारी यांचे माध्यमातून सदर चहा नाश्ता वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते लाखो भाविक याचा लाभ घेत असतात स्वंयम सेवक म्हणून आई प्रतिष्ठान वाघोली, भारतीय जैन संघटना वाघोली,दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान बकोरी, माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांचे शेकडो कार्यकर्ते दिवसभर याठिकाणी चहा वाटपासाठी काम करत असतात श्रमदान करत असतात प्रत्येक जन आप आपली कामे अगदी सिस्तित व्यवस्थीत करत असतात वारकरी आवर्जून याठिकाणी थांबत असतात कारण याठिकाणी कपामध्ये चहा दिला जातो त्यामध्ये बिस्किटे,बटर व्यवस्थीत बुडवून खाता येते वारकरी त्याचा आनंद घेत असतात, उपवास असणार्या वारकऱ्यांना वेफर्स वाटण्यात आले.

   तसेच दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान, माहिती सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लाखो देशी झाडांच्या बियांचे वाटप वारकऱ्यांना करण्यात येते या वर्षी हेमंत लुनावत यांनी सुद्धा त्यांचे वडीलांचे स्मरणार्थ बिया वाटप केल्या व त्या बीया पंढरीच्या वाटेवर लावण्यास सांगितले जाते व पर्यावरण, जलसंधारण, वृक्षारोपण  याबाबत वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे यांचे माध्यमातून प्रबोधन केले जाते ,वाघोली येथील अनेक मान्यवरांनी त्याठिकाणी आवर्जून भेट दीली त्यामध्ये सौ. सुजाता कृष्णकांत सातव पाटील, मिनाकाकी सातव पाटील, विजयराव जाचक यांनी भेट दिली व चहा नाश्ता वाटप, बिया वाटप या कार्यक्रमाचे कौतुक केले व स्वतः कार्यक्रमात सहभाग घेतला.

तसेच पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचारी यांना चहा नाश्ता दिला व पंढरपूर पर्यंत पुरेसे असे बिस्किटे देऊन त्यांचे स्वागत केले ऊपस्थीतामध्ये माहिती सेवा समितीचे अध्यक्ष वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे, कमलेश बहीरट (अध्यक्ष माहिती सेवा समिती हवेली), शिवाजी चव्हाण (निवृत्त अधिकारी अग्नीशामक दल), ज्यांनी खर्याअर्थाने दिवसभर चहा कॉफी केली ते सचीन जैन,बाळु कदम, चंद्रशेखर लुकंड, हेमंत लुनावत,अमित वाघोलीकर, सुरेश जगताप,सिद्धांत जैन, निलेश वानघोता, दर्शन लुकंड, पाणी व्यवस्थापन करणारे बापू आखाडे,राजू गोंवंड, बापू कुंभार,मंडप व्यवस्था पाहणारे भारतीय जैन संघटनेचे गिरीश शहा,शाम पाटील, विनायक नात तसेच रुषी परदेशी,विलास नवले, गणेश कटके, विवेक जाधव,माने सर, दत्तात्रय सलगीर, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर,धणराज वारघडे (अध्यक्ष दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान बकोरी) यांचे सहीत महीला भगीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आई प्रतिष्ठान चे अध्यक्ष मनोज कांकरीया यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच वारकऱ्यांना पिशव्या वाटप केल्या प्रमुख मान्यवरांना लक्ष्मी तरू हे बहुगुणी झाड भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अशाप्रकारे रात्री सात वाजता चहा नाश्ता वाटप कार्यक्रम संपन्न झाला.


**The tea and snacks distribution during the Palkhi procession organized by Aai Pratishthan is commendable - H.B.P. Mina (Kaki) Satav Patil**


For the past 22 years, Aai Pratishthan Wagholi and the Indian Jain Association Wagholi have been distributing tea, snacks, raincoats, and bags to the pilgrims of Sant Dnyaneshwar Maharaj's Palkhi procession. Additionally, for the past 4 years, the Dada Babaji Wargade Pratishthan Bakhori has been distributing seeds of indigenous trees to inspire tree planting and environmental conservation among the pilgrims. H.B.P. Mina (Kaki) Satav Patil spoke during this event.


Beyond Saswad, at the Belasar junction, the tea and snacks distribution program is organized through the chief organizer Manoj Kankariya and his team. Millions of devotees benefit from this. As volunteers, hundreds of workers from Aai Pratishthan Wagholi, Indian Jain Association Wagholi, Dada Babaji Wargade Pratishthan Bakhori, and the Information Service Committee Maharashtra work throughout the day serving tea. They perform their duties in a well-organized manner, and pilgrims frequently stop here as tea is served in cups along with biscuits and butter. Devotees enjoy this, and those observing fasts are given wafers.


Additionally, the Dada Babaji Wargade Pratishthan and the Information Service Committee distribute millions of seeds of indigenous trees to the pilgrims every year. This year, Hemant Lunavat also distributed seeds in memory of his father and suggested planting them on the Pandharpur route. Tree friend Chandrakant Wargade provided education on environmental conservation, water management, and tree planting. Several dignitaries from Wagholi visited, including Mrs. Sujata Krishnakant Satav Patil, Mina Kaki Satav Patil, and Vijayrao Jachak, who praised the tea and snacks distribution and participated in the event.


Tea and snacks were also provided to the Pune Municipal Corporation's fire department officials and staff, with ample biscuits given for their journey to Pandharpur. Present at the event were Information Service Committee President Tree Friend Chandrakant Wargade, Kamlesh Bahirat (President, Information Service Committee Haveli), Shivaji Chavan (Retired Fire Department Officer), Sachin Jain, Balu Kadam, Chandrashekhar Lukand, Hemant Lunavat, Amit Wagholikar, Suresh Jagtap, Siddhant Jain, Nilesh Waghota, Darshan Lukand, water management experts Bapu Akhade, Raju Govand, Bapu Kumbhar, and others. The Indian Jain Association's Girish Shah, Sham Patil, Vinayak Nat, as well as Rushi Pardeshi, Vilas Nawle, Ganesh Katke, Vivek Jadhav, Mane Sar, Dattatray Salgir, Star Maharashtra News Channel's journalist Dnyaneshwar Patekar, Dhanraj Wargade (President, Dada Babaji Wargade Pratishthan Bakhori), and many other women were also present. The chief organizer, Manoj Kankariya, welcomed everyone and distributed bags to the pilgrims. Prominent guests were honored with the gift of a multipurpose tree, the Lakshmi tree. The tea and snacks distribution program concluded at 7 PM.

Gallery